I turned off my laptop…took my bag……and was walking towards parking lot…… I kicked my active…N tears started rolling down my cheeks………
घळा घळा अक्षरशः डोळ्यातून धारा लागल्या ..... आणि मला तेव्हा साधे डोले पुसावेसे देखिल वाटले नाहीत ... मी रडत होते की मनातल्या भावनांचा बांध फुटला होता काय माहित ...... उत्तरही माहित नाही .... उत्तर शोधावं का ?? असंही वाटलं नाही ........
महिन्याला bank balance वाढत आहे .... credit debit cards आहेत .... पण मन शांत नव्हतं ... ते उचंबळत होतं ... कुठे तरी वाट शोधत होतं ..... घुसमटलेल्याला मोकळा श्वास घ्यायला आतुर झाला होतं .... असं का होत होतं माहित नाही .... असे विचार मनामध्ये का येत आहेत माहित नाही .... खरच माहित नाही ......
ऑफिस च्या tension मुले डोळे पाणावत आहेत का ??
J M Road chya traffic cha कंताला आला आहे का ??
का गाडीच चालावाविशी वाटत नव्हती ?? की स्वतहाच्या घराचं कुलुप रोज़-रोज़ स्वताहाच उघदय्चा कंटाळा आला होता ?? की गच्चं भरलेल्या ऑफिस नंतर मोकळ घर खायला उठत होतं ?? की अभ्यासाचं टेंशन ?? की एकटं जेवायचा कंटाळा आला होता .......... की रोज़ स्वताहाच केलेला experimental breakfast ला वाह वाह म्हणून खायला नको वाटत होतं ..... की आईच्या चवीचा आभास जाणवत होता ....?? की आईने केलेला साधा वरणभात कुठे तरी हरवला होता ....?? माहित नाही .....
सगळ्यांमध्ये असून कुठेतरी एकटेपणा जाणवत होता..... की मैत्रिणी कुठे तरी हरवल्या सारख्या जाणवत होत्या ....की सारा फ़क्त मनाचा खेळ होता ....खरचं माहित नाही
पण रडावसं वाटत होतं ...... ते , ते डोळे पुसवेसेही साधे वाटत नव्हते .... असं वाटत होतं की ह्या फुटलेल्या बांधाला आज आवारुच नये ..... त्याला त्याच्या दिशेनं आज वाहू द्यावं ........ त्याला त्याच्या परीने आज मन मोकळ करू द्यावं ......आणि असं का वाटत होतं ते ही खरचं माहित नाही .............