प्रत्येकाला आपलं आजोळ अगदी प्राणप्रिय असतं.. कारण बालपणीच्या सुखद, निखळ, निरागस, आठवणी त्यात दडलेल्या असतात.... ज्यांची पुंजी म्हणजे एक प्रत्येकासाठी ठेवा असतो. एक खजिनाच जणू ..वाट्टेल ती रक्कम देऊनही कधीच न घेता येणारा एक मौल्यवान खजाना .....
तर अश्या आजोळी मी खूप मज्जा केली ..... म्हणजे लहानपणी शिकवलेलं गाणं असतं ना ज्याचं दर्शन सतत पुस्तकात , पापर मध्ये मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत होत ...
" झुक झुक झुक झुक आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी ...
पळती झाडे पाहूया ....
मामाच्या गावाला जाउया ....."
म्हणजे पुण्याला येताना धूर सोडणाऱ्या , बोगद्यातून , गुबगुबीत हिरव्या झाडातून आणि निसर्गाने नटलेल्या गावातून आम्ही यायचो पण पुढे आजोळी म्हणजे परीन्च्याला जाताना आगगाडी अर्थात ट्रेन नसून आमचा प्रवास लाल गाडीतूनच व्हायचा ......मधूनच रुक्ष भासणारा पण सुंदर वळण वळणाने नटलेला, सजलेल्या दिवे घाटातून गाडी सरकत आजोबांचं छोट्याश्या परीन्च्यात येऊन थांबायची तेव्हा गगनही ठेंगण भासे ....
छान सुंदर मस्त कौलारू घर, मोठ्ठा दरवाझा, छान ओसरी आणि भलं मोठ्ठ आंगण .... असं एकदम मराठी picture style आजी - आजोबांचा वाद ....
मग हमखास बैलगाडीची सैर , गणपतीच्या आणि असंख्य देवळातली चक्कर ,टेकडी वरची रपेट आणि ती सुद्धा आजीने दिलेला खाऊ खात खात केलेली मजा ....संध्याकाळी शाळेच्या ground वर ची चक्कर , ती सुद्धा चीनचा खात खात ...शाळेतलं आपली मूळ घट्ट रोउन उभं असलेलं वडाचं झाड ( ज्याबद्दल मला अजूनही attraction आहे ... का ते माहित नाही... ) चिंचा, रामफळं , आणि हट्ट न करता असंख्य गोष्टी ....
सगळं असं काही डोळ्यासमोरून जात आहे जशी काल- परवाचीच गोष्ट .....
दिवाळीतल्या सुट्टीत गेले तर हमखास आजीचा सुरेख फराळ , म्हणजे आजीची किती करू आणि किती खायला देऊची धडपड आणि आजोबांची कुठे - कुठे चक्कर मारायला नेऊ आणि किती विविध फटाके देऊची घाई ...
मग काय बेसनाचे लाडू, चकल्या, चिवडा, रंग - बिरंग्या करंज्या (ज्यांचा मला आफाट attraction आहे ... अगदी अजूनही ...)आणि बरंच काही ....आणि हो मी गेले कि दुधी हलवा patent पदार्थ तयार ...तेव्हा तो मला जरा जास्तच आवडायचा कारण ..... आणि दिवाळीतल्या सुट्टीतल अजून एक attraction म्हणजे चुलीवरचा गरम गरम पाणी....
शेतातली चक्कर तर हमखास ठरलेली ... तिथे पाटात उभं राहायला तर इतकं भारी वाटायचं.... ती विहीर, त्या मोटारीचा एक विशिष्ट आवाज , बैलांच्या गळ्यातला घुंगरांचा लयबद्ध आवाज ..... सगळं इतकं छान ..पत्त्यांचा डावही ठरलेला ... फक्त मी आणि आजोबा ... आणि कुठला माहित आहे ..." Not @ Home " किंवा फार फार तर challenge ......
" आजोबांच्या डोळ्याला चष्मा..
आणि माझी मज्जा " ...
संध्याकाळी शुभंकरोती, आणि संध्याकाळी लवकर जेवण, आणि रात्री आजीच्या कुशीत आजीच्या चौघडीत.... हे खरं स्वर्ग सुख ....
मे महिन्याच्या सुट्टीतही हीच धमाल..... पण ह्याचात भर म्हणजे ... कुरडया, पापड्या, सांडगे, आणि असे असंख्य उन्हाळी पदार्थ ...त्या कुरडया खायला तर किती तरी अजून आज्या.... घरात माणसांची हि वर्दळ....मग सगळी कडे त्या चिकाचा हा घमघमाट सुटायचा .....आणि मग वाटी चमच्याने खायची धावपळ ...आणि संध्याकाळी आजोबांकडून infinite icecream ची treat .....रात्री तर आंगणात झोपायची इतकी गही कि ८ वाजल्यापासूनच गाड्या घालून तयार ...मग रंगायची ती आजोबांची गोष्ट "आलीबाबा आणि चाळीस चोर "...पात्रं अन पात्रं असं हे डोळ्या समोर उभं रहायचं....कि मी आणि श्रुती घाबरून गुडूप ....
आता त्या वाड्यात मात्र आम्ही कोणीच नाही ...त्यामुळे शेत, देऊळ , तिथल्या पेठ ...सगळं एकदम थांबलं , मग ते कोपर्यावरचा उमा मावशीची गिरणी असो, किंवा राजारामचा दुकान .....धुमाळ आजोबांचं दुकान असो किंवा पप्पू दादाचं घर ,,,पण त्या आठवणी अजूनही ताजा आहेत ....तशाच रेंगाळत आहेत ...अगदी कालच घडलेल्या गोष्टी सारख्या ....
मे महिन्यात सासवड - परिंचे trip झाली तेव्हा तो वडा .... ते देऊळ काही निराळाच भासलं...पुन्हा सगळ्या आठवणी ताज्या झाल्या ...अरे इथे तो बाबा आदमच्या काळातला आजोबांचं लाडका आणि अजूनही छान फिरणारा पंखा असायचा.....इथे लिहायचा table ....अरे ओटा, ओसरी, इथेच क्रिकेट खेळायचो ...प्रदक्षिणा मारायची घाई आणि त्यातही स्पर्धा ....
असाच जर उलटं चक्र फिरलं असतं तर...पुन्हा त्या जुन्या गोष्टींचा उजाळा , पुन्हा ते मस्त स्वत्चांडी जगणं, खायचं , खेळायचं आणि झोपायचं....आणि मनसोक्त फिरायचं.........