चहाला वेळ नसते …वेळेला
चहा असतो …
हे वाक्य अगदी तंतोतंत खरं आहे . ती तल्लफ़च वाईट. गारठा, कुडकुडणारी थंडी, पाऊस …असं वातावरण आपोआपच त्या ‘एक कप चाय’ ची आठवण करून देतं .
पाय तुडवत घराच्या दिशेने पाय पळू लागतात. आणि मनात विचार येतो ‘आता इथे जर ह्या कोपऱ्यात मी चहाची गाडी टाकली …आणि ‘Tea On Wheels’ असं म्हणत आपल्या सारख्या अनंत गरजू लोकांना चहा पुरवला तर काय आशीर्वाद मिळतील.
हे वाक्य अगदी तंतोतंत खरं आहे . ती तल्लफ़च वाईट. गारठा, कुडकुडणारी थंडी, पाऊस …असं वातावरण आपोआपच त्या ‘एक कप चाय’ ची आठवण करून देतं .
चहाहि गोष्टच अशी आहे ना …कि
म्हणजे एक प्रबंध तयार होऊ शकतो . पु
ल च्या भाषेत ‘साधी आपली लोकं काय आपले साधे पोहे आणि चहा
….. आणि अशी श्रीमंत लोकं मग जायफळयुक्त कॉफी आणि बटाटे पोहे वगैरे’’.
पण चहाची तहान हि चहाच घालवू शकते. म्हणजे
एक असं special
नातं असतं त्या चहा बरोबर. आधी
बिस्कीट किंवा टोस्ट बुडवण्या एवढाच चहा मिळायचा …. मग
दुधाचा चहा , नुसता रंगाचा
देखावा …. आणि पूर्वी शाळेत त्याची कधी आवड पण नव्हती.
मग पुण्यात आल्यावर
3.30 चा चहा introduce झाला. थंडीत तो गरम कप सुरेख वाटू लागला.
आपला वाटू लागला . आणि मग पुरुषोत्तम .
पुरुषोत्तम =
theatre = 1 किटली = मागून मागून प्यायलेला चहा.
आणि मग ऑफिसला
तर आपणच म्हणायचं
‘’झोप येत आहे यार
, चला चहा पिऊयात ’’. मग
इथं पासून सुरु होणार समीकरण, ‘कंटाळा येतोय चला चहा’, ‘वेळ
झाली चला चहा’, ‘मीटिंग
आहे माझी ग …त्या
आधी पटकन चहा पिऊयात’,
‘ह्या AC ने डोकं जड झालय, चला चला पिऊयात’ ‘घसा
खवखवतोय, चला चहा’
तर थोडक्यात त्या चहाशी एक नातं आहे . अगदी जवळच, घट्ट, आपलं असं .
मग तो दहा वेळा उकळून दिलेला असो , टपरी वरचा असो.
तर अशा ह्या गोष्टी बद्दल एवढा लिहिण्याचा
कारण असं कि …. पर्वा
अशीच कोपऱ्यावरच्या टपरीची
फार प्रकर्षानं आठवण झाली.
आपण बाहेरच्या देशात असतो
, थंडीने गुरफटलेलो असतो . घरी
जायला म्हणून लागतो , आणि
अचानक गार वारं , आणि
पाऊस सुरु होतो. ह्या
अश्या कुंद पावसाळी
वेळेला, त्या एका कपची आठवण नाही झाली तरच नवल.
मग तुमच्या लक्षात
येत कि घरचं दूध संपलंय. मग ते
आणायचे आहे. आणि मग रस्ते लक्षात
ठेवत ठेवत ..त्या google च्या
बाईचं ऐकत ऐकत – ती तुम्हाला
योग्य दिशा दाखवत असते.
आणि मग
तुम्ही पोचता खरं पण ते दुकान बंद दिसतं
. तुम्ही अगदी नवखे . थोडासा गोंधळ उडतो. मग
पुन्हा चालायला लागता, वारा, पाऊस सोबतीला
असतोच. आणि मग रस्ते , गाड्या , नवीन चेहरे असं गोंधळून
जात , त्या एका दुधाच्या
कॅन साठी फिरत बसता
. शेवटी ‘देवा …. आता खरंच वरून पावसाच्या
ऐवजी चहा पाड थोडासा’,
अशी फँटसि सुद्धा डोक्यात येऊन जाते.
बरं ते
नाहीतर एखादं दुकान तरी दाखव रे देवा. Weekend चा मूड असतो
. आपल्या डोक्यात एकंच चहा हवाय. आणि
मस्त उकळलेला , दुधाचा असा चहा हवाय. देव
पावतो एकदाचा थोडासा , एक
दुकान दिसतं …. ‘Wine, Beer and
Grocery’. Grocery मध्ये दूध असणार ह्या आशेने आपण आत जातो.
तर अनंत
प्रकारच्या दुधाच्या बाटल्या
नजरेस पडतात. आणि दुसरा माणूस त्या बाटली कडे बघण्याचा विचार करायच्या आत …आपण
झेप घेऊन ‘पेहले
मैने देखा’ असं म्हणत ती बाटली घेऊन बाहेर.
पाय तुडवत घराच्या दिशेने पाय पळू लागतात. आणि मनात विचार येतो ‘आता इथे जर ह्या कोपऱ्यात मी चहाची गाडी टाकली …आणि ‘Tea On Wheels’ असं म्हणत आपल्या सारख्या अनंत गरजू लोकांना चहा पुरवला तर काय आशीर्वाद मिळतील.
असो … आणि मग तो छान उकळलेला
चहा , गॅस वरून , भांड्यात , गाळतणीतून कपात
आणि मग माझ्या
घशात जाताच मला कळलं ‘स्वर्गानंद’ बहुदा ह्यालाच
म्हणत असावेत.