Tuesday, October 2, 2018

जिस स्कूल में बेटा तुम पद्धत हो ......


पोटात गोळा येणं, नक्की काय होतंय हे न कळणं, tension येणं म्हणजे बहुदा  extra 3 4 वेळा  washroom ला  भेटी देऊन येणं, ना कळणं ना झेपणं ह्यालाच बहुदा मोट्ठ्या भाषेत स्ट्रेस असं  म्हणत असावेत. तर असला स्ट्रेस  वगैरे मोट्ठे शब्द झेपत नाहीत आपल्याला. पण हं छोटासा आपला पोटात गोळा येणं वगैरे  कळतं.

आणि त्यात विमान प्रवास कोणी एकटं करणार असेल तर आपोआपच  हे  सगळं  होतं. आई  UK to India असा  प्रवास  करणार  होती. नेहमीचे आपले  bombarded words, printouts असे सगळे प्रताप मी तिला करून   दाखवले होतेच. Youtube चे  videos सुद्धा. हे पहिल्यांदाच होतं म्हणून आपलं  थोडासा  गोळा. नाहीतर एरवी   बहुदा हे संभाषण सुद्धा झाला नसतं.

तर हे असं सगळं सुरु  होतं. अधून मधून चर्चा, काय  कर, काय करू नकोस. सामान काढा, पुन्हा  टाका, stamp मारा, 2 boarding pass नीट ठेवणे इत्यादी . List is big. आणि मग जायची वेळ येते. Emergency contacts, printouts, सूचना. Wifi असं  सुरु  करणे, flight mode वर टाकणे वगैरे सुद्धा येताच त्यात. मध्ये  5.5 तासाचा  layover वेळ आहे त्यात हे शोध, तिथे फिर, phone उचल वगैरे.

आणि असं सगळं नीट करत, विचारात, वाचत आई सुखरूप  पुण्याला  पोचते. फोन  वर  सतत  कॉन्टॅक्ट  ठेवत, messages, watsapp ह्यांचा आधार  घेत, सगळं  कळत  राहतं. आणि तिथे जायच्या आधी, घरातलं  सगळं  आवरून, अगदी  “तुला धुळीची allergy आहे, हे  carpet झटकत  बसू नकोस, असं म्हणत झाडून सुद्धा  झालेलं असतं. “इथे लाडू करून ठेवले आहेत. हे घेऊन जायचे, हे इथे ठेवायचे. नीट लक्ष दे सांगते तेव्हा, वेंधळे  पानाने विसरून जाशील ” हि विशेष टिपणी तर हवीच. म्हणजे  कितीही  मोठ्ठ  झालं, आणि कितीही लहान  असला तरी  वेंधळेपणा असतोच. आणि  नसलं तरी भासवायला छान वाटतं. हे आवरलंय, ते  ठेवलंय, हे केलंय  हे जाई पर्यंत संपत नसतं. आणि जाताना फोन. इथे राहून जे रोजचे परिचयाचे झालेले असतात, त्यांना अच्छा, टाटा bye bye असतंच. कारण 3 महिन्यात निसर्गाच्या विविध छटां  बरोबरच विविध माणसं, आणि त्यांच्याशी  झालेल्या गप्पाहि अस्तततच. “मग काकू जाणार तेव्हा फार वाईट वाटणार असं म्हणत एखादी मैत्रीण खाली   येऊन....पुण्यात आलो कि भेटूच हं असंही सगळं होतं. “आजी आमच्या घरी ये हंपुण्यात असं छोटा बंडू  पण सांगून जातो.

हे सगळं करत, परत हे घेतलं ना, ते घेतलं ना. हे नीट ठेवलंस ना. अशा mutual सूचना सुरु  होतात. आणि खरंच  multitasking हि उत्तम रित्या एक बाईच  करू शकते हे पुन्हा  एकदा  सिद्ध होतं (ह्यात  कुठलंहि  Women Empowerment, gender bias वगैरे नाही. पण हि फॅक्ट आहे ).

आणि धाकधूक, सतत  contact मध्ये  राहून, सुटकेचा निश्वास टाकत, प्रवास व्यवस्थित होतो. आणि उगाचच नंतर  वाटतं, आपण  उगाच  underestimate करत होतो का. कि ती काळजी रास्त होती.

आणि  ह्या  सगळ्या  कार्यक्रमात  बहुदा  मी  विसरून  गेलेले  असते  कि  “जिस स्कूल में बेटा तुम पद्धत हो , उसके हम प्रिन्सिपॉल हैं ”.