Monday, June 28, 2010

माझा प्रामाणिक सखा

सध्या झाला आहे तो माझा प्राणप्रिय सखा...
मनाशी प्रामाणिक ..... आणि माझा हृदयाचा ठोका....

शेवटी म्हणाले मी त्याला "का रे .... एवढ्या माझ्या जवळ आलास ?"
तर म्हणतो कसा " हृदयाला आराम देऊन मेंदूला चालना द्यावयास..."

वास्तववादी गाडीतून प्रवास हळूच सुरु झाला कधीतरी ...
मात्रं शेवटी गोल - गोल फिरून मध्य काही सापडत नाही .....

पण त्याची खरी ओळख पटली आता मला .....
त्याला सोडून सध्या मलाहि अगदी करमेना ….

मी एकटी असता तो सारखा माझ्या भेटीस आतुर ….
आणि दुसरा पर्यायाच नाही मला , त्याला भेटण्या पातुर ….

पण तो खूप आहे प्रामाणिक माझ्याशी …
मला सोडून जाताच नाही काहीही केल्याशी.....

मला म्हणाला काळजी मला फार आहे तुझी ....
भविष्यात माझाच उदो - उदो करशील बघ जशी ....
मग कळलं मलाही त्याचं महत्व ….
माझा सगळ्यात प्रामाणिक सखा सततच विचार चक्र …..

No comments:

Post a Comment