Monday, February 17, 2014

मुक्तछंद …

कधी कसा शांत सोज्वळ … कधी रौद्र, तामस
कसे असे रे हे तुझे रूप ?
आगळे वेगळे भासे निराळे
आत्ता म्हणावं भासतोस असा
म्हणजे असाच असावास अंतरी तुझ्या
पण क्षण पुढचा अगदी निराळा
माझ्या विचारांच्या क्षितिजा पलीकडचा …
आधी केला तुझ्याकडे कानाडोळा
नंतर तूच गुंतावलास अंतरी मना
आणि गुंता अलगद होत गेला शृंखले सारखा
अलगद , नाजूक  गुलाबाच्या फुलासारखा
अन मग अचानाक रूपं दाखवुन शांत , निपचित झाला
प्रश्न असंख्य मनी उरले
अंधारात प्रकाशाचा एक ठिपका शोधत फिरले
आत आत पाणी पाणी
कोरडे शुष्क डोळे …
झऱ्या खाली खोलवर वाळवंटी  उरले
गरज भासू लागली त्या एका थेम्भचि
चातका  प्रमाणे आस लागली मनी
ये आता , … नको आणिक हुरहूर मनी
,थकल्या,  भागल्या,जीवाला  गरज त्या आभासाची
मनी मोर घालू लागे पिंगा
आता कधीच ना उरण्या , थांब्ण्यासाठी
अखंड पिसारा फुलवून थुई थुई नाचण्या परी
ना मनी प्रश्न , सगळं कसं स्फटिका प्रमाणे
स्वत्छ , निर्मळ , निळ्या क्षार पाण्या परी
आला जोरात मग तो , निळ्या मेघांना सारून
काळ्या कुट्ट अंधाराला सारून जोरात बरसलास तू
मनापासून सरीवर सरी मनी चिंब चिंब केलास तू
असा हा पाऊस  समजण्या पल्याड ,
पण तरी कसा निर्मल, निरगस , पारसमणी
माझा लाडाचा जीवा भावाचा …
भावनांनी कंठ दाटून आला जेव्हा …. नभं उतरू आलं माझ्या अंगणी तेव्हा …

No comments:

Post a Comment