झी मराठी वरचं “ पुरुषोत्तम करंडक ” हा कार्यक्रम, आणि त्यात “Cummins च्या 16 जणींनी मिळवलेला केशवराव दाते ” हा उल्लेख ऐकला आणि खूपच मस्त वाटलं.. म्हणजे कॉलेज सोडल्या नंतर आपल्याच कॉलेजचं नाव अभिमानानं कोणीतरी घेतंय ह्या गोष्टीने उगाचंच कॉल्लर ताठ झाली….. आणि मग 2-3 जणांनी त्याच गोष्टीची विचारणा केल्यावर …. मला 2006 सालातले ते मंतरलेले 3 महिने डोळ्या समोर आले …..
काहीतरी लिहायचा हे डोक्यात, मनात होतं….पण काय कोणास ठाऊक “ek trigger” मिळत नव्हता….. मधुचा blog वाचला आणि चक्र सुरु झाली (Thanks Madhu for this :) ), आणि त्यात मधूने लिहिलेलं “दस बज्कर सत्राह मीनट कि बोरीवली से चर्चगेट जाने वाली ये धीमी लोकल ” हि announcement….
सगळ्या तालमी, पहिला दिवस, चक्री, मंदारचे workshops सगळं सगळं एखाद्या सिनेमासारखं flash झालं…..
“दहा सतरा” आणि “पुरुषोत्तमशी" माझा संबंध शुन्य होता…. कोणीतरी म्हणलं की 'अगं 1-2 लोकं अजून हवी आहेत team मध्ये , म्हणून जायचं तर जाऊन ये.' “नाटक करायला मिळणार” ह्या कल्पनेने मी जाम खुश होते, आणि stage वर मला घोळका दिसला. आमच्या वर्गातल्या तीन जणी सुद्धा दिसल्या, थोडंसं बरं वाटलं….. एका मुलीने विचारलं “तुला काय करता येतं…? करून दाखव” हे ऐकल्यावर तर “मला काहीच येत नाही….. आणि आता अचानक भूगोलाचा पेपर आहे आणि मी गणिताचा अभ्यास करून आले आहे” इतका वाईट पोटात गोळा सुद्धा आला. शेवटी बहुदा त्याच मुलीला आमची दया आली असावी…. तिने “Cummins च्या कागदांवर” बरंच काहीतरी लिहिलेलं एक गठ्ठा हातात दिला….आणि त्यातल्या दहा ओळी वाच असं सांगितलं. आम्ही 3-4 जणी होतो.
प्रत्येकानं वेगवेगळ्या पट्टीत, सुरात, अविर्भावात, pause, जोर असे सगळे अभिनयातले येतील ते गुण प्रदर्शन करून ती वाक्य वाचली, वाचताना एवढं लक्षात आलं की हे नुकत्याच झालेल्या “Mumbai Serial Blast” वरचं काहीतरी आहे. झालं आणि आम्ही निघालो… Quandrangle मधून जाणार तेवढ्यात त्याच मुलीने पुन्हा हाक मारली….. “अजून एक paragraph देते, तो पण वाचून दाखवशील का ?”…. कुठलाही arrogance, माझ त्या वाक्यांमध्ये नव्हता, आणि त्या गोड आर्जवाला नाही म्हणता येणही शक्य नव्हतं…. म्हणून तिने हातात दिलेला अजून एक paragraph वाचला….. आणि नंतर मला कळलं की मला दोन दिवसांनी पुन्हा तिथेच बोलावला आहे. खरं सांगायचं तर मला भयंकर tension आलं होतं, कारण त्यातला एकही चेहरा माझ्या ओळखीचा नव्हता. पण दोन दिवसा नंतर मी गेले आणि त्याच मुलीने मला “तुला जमेल ना ग मग ? साधारण रोज नऊ तरी वाजतील, राहतेस कुठे ? आणि tension घेऊ नकोस. आम्हाला तरी कुठे काही येत होतं, पण एक सांगते खूप मज्जा येईल…पुढच्या दोन महिन्यात खूप मज्जा येईल” …आणि अचानक मी झाले “सोनूची आई”
ही मुलगी म्हणजे “मधुराणी सप्रे” आणि तिच्यात सगळ्यात convincing कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तिचा साधेपणा. आणि हेच सतरा अनोळखी चेहरे कधी रोजचे झाले ते कळलं हि नाही. आता खरंच सगळं flash होतंय. कारण मी आले तो पर्यंत लिखाण, script असे मोट्ठे मोट्ठे मैलाचे दगड already “Done” होते.
पण आमची एन्ट्रीच fix नव्हती. कारण फॉर्म भरायला उशीर झाला होता, तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली prayer ती सुद्धा गोलात बसून. आणि त्यानंतर केलेली discussion. नाटक चांगलं होण्यासाठी team चांगली हवी, आणि team तेव्हाच चांगली होईल, जेव्हा त्यात bonding असेल. त्या BONDING ह्या शब्दाचा अर्थ आत्ता कुठे कळायला लागलाय असं वाटतंय. खरच ते Bonding नसतं ना, तर "दहा सतरा" मधले सतरा वेगळे चेहरे दिसले असते.
कॉलेज इतकं प्यारं वाटायला लागलं की विचारूच नका. कधी एकदा तीन वाजत आहेत आणि त्या stage वर मांडी ठोकायला मिळत आहे asa वाटायचं. मग गप्पा, रोजचे विविध games , Third क्लास गागी ती पण Electrical च्या लाब मध्ये, आणि मग सगळ्यात आवडती गोष्ट “चहाची किटली आणि त्यावर डोळे ठेऊन सतरा जणी” पहिला number स्नेहलचा, आणि ह्या सगळ्यातून वेळ मिळाला तर नाटकाची practise .
“कर्व्यांच्या पुतळ्या पर्यंत ऐकू यायला हवा आवाज”. ह्या भीतीने बेंबीच्या देठा पासून ओरडून केलेल्या तालमी असोत, किंवा उगाचंच हसणाऱ्या लोकांसमोर आपलं concentration हलु नये म्हणून केलेल्या तालमी असोत….Improvisation, Characterization, Bearing, घोडा हे अगदीच अपरिचित शब्द आता अगदी ओळखीचे व्हायला लागले होते. मग आमचा train चा प्रवास सुरु झाला. प्रत्येक station वर चढणारी वेगवेगळी लोकं परिचयाची व्हायला लागली. आणि boyfriend, नवरा , वडील हे फक्त फोनवर, किंवा विंगेतच दिसू लागले.
मग त्या भरत मध्ये, सामान ट्रकातून काढताना गप्पं बसलेल्या आम्ही 13 जणी, आमच्या समोर लोकं cheering करत आहेत , आरोळ्या ठोकत आहेत…पण काहीच करता येत नव्हतं, ती तगमग, “आपण stage वर कमाल करू….” हेच वाक्य मुठीशी धरून आम्ही आत शिर्लेलो आजही आठवत आहे…. भावे काकांचा makeup…. आणि मग गण…. त्या घोड्याला अगदी pen प्रमाणे पळवणारी अनघा…. पिट्टातून शांतपणे music देणाऱ्या सीमा-ऋजुता…. पडद्याच्या बाहेरून असं खणखणीत आवाजात ओरडणारी सानुजा.. आणि मग आमचा डबा भरत जयचा…. शाळेतल्या दोन गोंडस-द्वाड मुली, college ची so-called gang, एक आमच्या नर्सबाई सुशीला गायकवाड, आमच्या झोपणार्या काकू, मुंबईत बनायला आलेली heroine , आत्ताची corporate मधली एक मुलगी, एक typical लग्न झालेली बाई आणि तिची मुलगी, गळ्यातली - कानातली विकणारी, झाडूवालीबाई……
आहाहा असा गच्चं भरलेला डबा, मुंबईची आठवण नाही झाली तरच नवल. ते पावसाचे दिवस, पाण्यात खेळणाऱ्या मुली ….सगळं कसं अगदी तिथलंच…. प्रयोगाचा दिवस सुद्धा तितकाच नशीला…. म्हणजे कधीही बरोबर ना लागलेला कागदाचा बोळा आमच्या झोपणार्या काक्कुंना असा काही लागला, की खरंच त्या शाळेतल्या पोरींना येउन धपाटे घालतील की काय इतका सच्चा वाटला…. आमची सोनू आणि तिचा frock मिळवण्या साठी केलेली धडपड, तिच्या त्या गोंडस दोन शेंड्या “ आणि आई मला पण दे की ग ते Uncle Chippp” हे खास style वाला वाक्य…. “कसलं बोडक्याच आलंय हो MUMBAI SPIRIT” …आणि गच्चं भरलेला डबा अचानक रिकामा आणि भकास जाणवू लागला…..
ह्या सगळ्यात, reporters शी आपलीच बाजू, आणि त्यात होरपळणारी जनता…हे खरंच अंगावर यायला लागलं. त्या कविता आणि त्यातला USP “आत आत पाणी पाणी कोरडे कोरडे डोळे, अजूनही धुमसत आहेत ते आगीचे गोळे” ही वाक्य …”अंगावर येणं” म्हणजे काय असतं हे बहुदा तेव्हाच कळलं. आणि तरी सुद्धा किती दिवस थांबणार, “सगळं सुरु… घड्याळ सुरु, चक्र सुरु…. वेळ थांबता थांबत नाही." आणि पुन्हा एकदा " दस बज्कर सत्राह मीनट कि बोरीवली से चर्चगेट जाने वाली ये धीमी लोकल ” हे ही चालूच…..
ह्या सगळ्या डब्यात इतकी विविधता होती…तरी ती एकसंध होती…एकसाथ धावत होती…. ते प्रतिनिधित्व करत होतं त्या एका चेहऱ्याच….त्या सगळ्यात होरपळलेल्या एका माणसाचं…. विविध धागे विणून एकाच कापडाच…. आणि म्हणूनच त्यांना ही तो वेगळा काढता येणं अशक्य होतं…. आणि म्हणूनच “केशवराव दाते” आमच्याकडे आला असावा…तो हि तेरा जणींना .. आणि त्याच बरोबर “हरी विनायक” सुद्धा ….
ह्या सगळ्या यशात त्याच त्या BONDING चा फारच मोठ्ठा वाटा आहे….
आणि म्हणूनच “सतरा जणी एकच चेहरा दहा सतरा”

No comments:
Post a Comment