Tuesday, February 15, 2011

असंच कधीतरी …..


असंच कधीतरी ….. म्हटलं आठवूया जुने ..
हातातुनी किती वाळू निसटली हळूच शोधूया ते ...
कोणी विचारलंच जर कि हा वेडा प्रयत्न का करत आहे मने ..
उत्तरही ठरवलं त्याने कारण तेच, कारण शेवटी जुने तेच सोने..

कालचा क्षण होता कसा ? ,गेला कसा?, का गेला तसा ?
असंख्य प्रश्न उठतात नुसते…आणि उत्तर शोधण्यात मग ते इवलसं मन पार थकते..
मग ते वेडा मन स्वतःलाच समजावते आणि भविष्याचा विचारात रमते..
आणि मग असलेला क्षण हातातल्या वाळू प्रमाणे झर्रकन सरकते..

काळाला म्हणे बंधन नसते कोणाचे
क्षणाचा एक अवधी ही पुरेसा असतो त्यासे
भुताचा वर्तमान व्हायला तो एकंच अवधी पुरून उरते..
आणि मग असंच कधीतरी वर्तमान हरवून बसतो अस्तित्व त्याचे..

पण मग मी ठरवलं पक्कं…
गेला तो निसटला, पण खूप काही शिकवूनी गेला..
येणार्यांना समजण्यात हुशारी देऊन गेला
आजच्या आनंदावर कालची साय नको आता….
आणि उद्याच्या विचारात मनी भारही नको फारसा…

आहे तो उपभोगायचा…… त्या क्षणास कुशीत वसू द्यायचा….
मग छान प्रसन्न वातावरणात त्या मनाला मोकळा श्वास घेण्यास सोडायचा …
आणि त्याच्या दिशेनं त्याला मोकळं करायचं….
मग असंच कधीतरी मनी बांध फुटतो….
आणि आवरण्यासाठी चक्क नकार दर्शवतो…

तो फुटलेला बांध तसाच वाहू द्यायचा..
त्या बंधनाच्या कुडीतून त्याला मुक्त होऊ द्यावं
म्हणून तो आलेला प्रत्येक क्षण स्वछंद पणे जगायचा….
प्रत्येक क्षणातलं अमृत ठीबकाने प्यायचं….
आणि प्रत्येक ठिबकणाऱ्या अश्रूतून त्याचं अस्तित्व मात्र दरवळू द्यायचं………….









4 comments:

  1. It's really difficult to get thru so much Marathi.... but something tells me it's a beautiful piece...the parts that I could assimilate... :)

    ReplyDelete