चूल आणि मुल…असं label असंख्य वर्ष एका स्त्रीला दिला जात होतं, गेलेला होतं…पण फार पूर्वीपासून ह्या गोष्टी पेक्षा, ह्या वाक्याला धुडकावून चूल,मुल आणि स्वतःचा स्वाभिमान अर्थात स्वतःच्या पायावार मुली खंबीर पणे उभ्या आहेत….मग ती मुलाला पाठीला बांधून रणागणा वरची लढाई असो, किंवा नवऱ्या बरोबर समाजाच्या हाल अपेष्टा सहन करत इतर मुलींना शिक्षणाचा मार्ग मोकळा करून देणं असो, किंवा परदेशी जाऊन डॉक्टर होणं असो…ते अंतराला पर्यंतची झेप असो..असंख्य उधाहरणं डोळ्यासमोर अशी उभी ठाकतात…
आता पर्यंत एखादा social service किंवा स्त्री-मुक्ती संघटनाचं भाषण वगरे वाटायला लागलं असेल …किंवा फार फार तर…स्त्री-पुरुष समानता वगरे असे मूल्य शिक्षणा मधले मुद्दे…
नाही पण घाबरू नका ह्या पैकी काहीच नाही….पण जे काही तुम्ही वाचला ते अगदी खरा आहे कि नाही ….आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उजाळा खऱ्या अर्थानं मिळाला तो म्हणजे परवा…
Deccan वरून येताना माझा घोडा म्हणजे माझी घोड्या सारखी पळणारी Activa नामक गाडी चा tyre puncture झाला तेव्हा….पण मला ह्याबद्दल काहीच गंध नव्हता मी गाडी मजेत चालवत असताना अचानक आपली गाडी हलत असल्यासारखा वाटलं आणि दांडी उडाली…आता काय करावं म्हणजे गाडी ढकलावी तर कशी कारण चढावर ती गाडी धाकालना शक्य नाही कारण पाठीला किमान 5 किलोचा वजन ( हे म्हणजे खरा स्वतःचा कौतुक करून घेणं….असं मला नंतर वाटला )…….कि puncture वाल्याला तिथेच बोलवावा…..
असे स्वतःचे लाड करून घेत …हळू हळू गाडी sinhagad Road वर आणली …..आणि puncture वाल्याला दिली …….पण इथे तर एक वेगळाच दृश्य दिसला ……त्या puncture वाल्याची बायको अतिशय सराईत पणे इतर गाड्यांचा tyres चे puncture काढत होती ……म्हणजे cycle पासून, motor-cycles पासून अगदी truck पर्यंत सगळ्या वाहनांचे....... मला दोन मिनिटे तिला कसा सांगावा ते कळेना……म्हणजे माझ्या हि मनात आला कि “ येईल ना हिला नक्की ??“….(पण मलाच माझी लाज वाटली..) पण नुसता puncture न काढता तिने मला tyre tube का गेली असेल आणि तो खिळा जो अडकून पडला होता तो हि काढून हातात दाखवला……आणि त्याच बरोबर चांगली tube कशी ओळखायची ह्याचे हळूच धडे सुद्धा दिले …..
काय शिक्षण झालं असेल हो तिझा???? किती इयत्ता शिकली असेल हो ती….पण गणित आणि practical knowledge चा खजाना होता …
त्या 8x8 च्या खोली cum तिच्या puncture shop मध्ये……….ती अभिमानानं वावरत होती आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लाऊन त्याच्या धंद्यात त्याला मदत करत होती …..मुलाला मधेच खायला देत होती ,स्वयपाका कढेही बघत होती, आणि समर्थ पणे दुकान हि सांभाळत होती ……..
मला तेव्हा तिच्यात आणि वर वर्तविलेल्या स्त्रियां मध्ये कुठलाच फरक जाणवला नाही ……त्याही स्वाभिमानी होत्या आणि हि सुद्धा त्यांच्याच सारखी …….पण हिला ती प्रसिद्धी, समाजात ते स्थान मिळेल ????.. सावित्री बाईंनी सुरु केलेल्या त्या यात्रेत अश्या असंख्य जणी अजूनही चालत आहेत…..काही जणी तिथेच थांबल्या….जगानं त्यांना सलाम केला,ते स्थान दिला, त्यांना बघून अभिमानानं छाती सुद्धा ताठ केली….. काही मात्र इतिहासात हरवून गेल्या…… कोणी everest सर करून आलं, तर कोणी पोलिसान मध्ये आपला नाव कमावलं……आणि अमुक अमुक करणारी पहिली महिला ठरण्याचा मान सुद्धा मिळवला …
पण आपली आर्थिक चण चण दूर करण्यासही आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा मिळवून समर्थपणे घर आणि हि अशी आगळी वेगळी नोकरी करणारी महिला पाहिल्यावर आम्हालाहि अभिमान वाटतो…आणि त्याच बरोबर स्वतः बद्दल क्षुद्र पणाची भावना देखील……आपण नक्की ह्या नोकरीचा टेंभा मिरवतो कि शिक्षणाचा …….आपल्या पेक्षा खरा तर किती तरी प्रकाराने समृद्ध आणि अभिमानास्पद काम करतात ह्या …..म्हणूनच ह्या अश्या आणि हिच्या सारख्या असंख्य स्त्रियांना माझा सलाम ....

No comments:
Post a Comment