Tuesday, October 2, 2018

जिस स्कूल में बेटा तुम पद्धत हो ......


पोटात गोळा येणं, नक्की काय होतंय हे न कळणं, tension येणं म्हणजे बहुदा  extra 3 4 वेळा  washroom ला  भेटी देऊन येणं, ना कळणं ना झेपणं ह्यालाच बहुदा मोट्ठ्या भाषेत स्ट्रेस असं  म्हणत असावेत. तर असला स्ट्रेस  वगैरे मोट्ठे शब्द झेपत नाहीत आपल्याला. पण हं छोटासा आपला पोटात गोळा येणं वगैरे  कळतं.

आणि त्यात विमान प्रवास कोणी एकटं करणार असेल तर आपोआपच  हे  सगळं  होतं. आई  UK to India असा  प्रवास  करणार  होती. नेहमीचे आपले  bombarded words, printouts असे सगळे प्रताप मी तिला करून   दाखवले होतेच. Youtube चे  videos सुद्धा. हे पहिल्यांदाच होतं म्हणून आपलं  थोडासा  गोळा. नाहीतर एरवी   बहुदा हे संभाषण सुद्धा झाला नसतं.

तर हे असं सगळं सुरु  होतं. अधून मधून चर्चा, काय  कर, काय करू नकोस. सामान काढा, पुन्हा  टाका, stamp मारा, 2 boarding pass नीट ठेवणे इत्यादी . List is big. आणि मग जायची वेळ येते. Emergency contacts, printouts, सूचना. Wifi असं  सुरु  करणे, flight mode वर टाकणे वगैरे सुद्धा येताच त्यात. मध्ये  5.5 तासाचा  layover वेळ आहे त्यात हे शोध, तिथे फिर, phone उचल वगैरे.

आणि असं सगळं नीट करत, विचारात, वाचत आई सुखरूप  पुण्याला  पोचते. फोन  वर  सतत  कॉन्टॅक्ट  ठेवत, messages, watsapp ह्यांचा आधार  घेत, सगळं  कळत  राहतं. आणि तिथे जायच्या आधी, घरातलं  सगळं  आवरून, अगदी  “तुला धुळीची allergy आहे, हे  carpet झटकत  बसू नकोस, असं म्हणत झाडून सुद्धा  झालेलं असतं. “इथे लाडू करून ठेवले आहेत. हे घेऊन जायचे, हे इथे ठेवायचे. नीट लक्ष दे सांगते तेव्हा, वेंधळे  पानाने विसरून जाशील ” हि विशेष टिपणी तर हवीच. म्हणजे  कितीही  मोठ्ठ  झालं, आणि कितीही लहान  असला तरी  वेंधळेपणा असतोच. आणि  नसलं तरी भासवायला छान वाटतं. हे आवरलंय, ते  ठेवलंय, हे केलंय  हे जाई पर्यंत संपत नसतं. आणि जाताना फोन. इथे राहून जे रोजचे परिचयाचे झालेले असतात, त्यांना अच्छा, टाटा bye bye असतंच. कारण 3 महिन्यात निसर्गाच्या विविध छटां  बरोबरच विविध माणसं, आणि त्यांच्याशी  झालेल्या गप्पाहि अस्तततच. “मग काकू जाणार तेव्हा फार वाईट वाटणार असं म्हणत एखादी मैत्रीण खाली   येऊन....पुण्यात आलो कि भेटूच हं असंही सगळं होतं. “आजी आमच्या घरी ये हंपुण्यात असं छोटा बंडू  पण सांगून जातो.

हे सगळं करत, परत हे घेतलं ना, ते घेतलं ना. हे नीट ठेवलंस ना. अशा mutual सूचना सुरु  होतात. आणि खरंच  multitasking हि उत्तम रित्या एक बाईच  करू शकते हे पुन्हा  एकदा  सिद्ध होतं (ह्यात  कुठलंहि  Women Empowerment, gender bias वगैरे नाही. पण हि फॅक्ट आहे ).

आणि धाकधूक, सतत  contact मध्ये  राहून, सुटकेचा निश्वास टाकत, प्रवास व्यवस्थित होतो. आणि उगाचच नंतर  वाटतं, आपण  उगाच  underestimate करत होतो का. कि ती काळजी रास्त होती.

आणि  ह्या  सगळ्या  कार्यक्रमात  बहुदा  मी  विसरून  गेलेले  असते  कि  “जिस स्कूल में बेटा तुम पद्धत हो , उसके हम प्रिन्सिपॉल हैं ”.

 

Thursday, September 20, 2018

विसर्जन - गणपती बाप्पा मोरया !! 🌈☀


गणपती बाप्पा म्हणजे आपला लाडका बाप्पा. तो त्याच्या बरोबर  चैतन्य, उत्साह, नवीन ऊर्जा सगळं सगळं घेऊन येतो . दीड, पाच, गौरी - गणपती, दहा अशा  विविध (आपापल्या  सोयीने) त्याचं विसर्जन होतं. त्यामुळे आरती, टाळ, घंटा, टाळ्या सगळं असं अगदी प्रसन्न वातावरण असतं.

वेगवेगळ्या आरत्या, वेगवेगळी  लय, चाल सगळं सुरेल वाटतं अगदी . त्यात नेहमीच्या ठरलेल्या आरत्या  म्हणजे “सुखकर्ता  दुःखहर्ता, “दुर्गे  दुर्गट भारी आणि  सगळ्यात  भारी  आणि  असा  ऊर्जेचा  स्रोत  घेऊन  येणारी  “शेंदूर  लाल  चढाओ”.

तर असा सण म्हणजे काय  बोलावं. आणि त्यात प्रसादाची रेलचेल. आणि  महत्वाचं म्हणजे उकडीचे मोदक. अहाहा. आई त्यावर साजूक तुपाची धार. त्याची  मजा  काही  औरच. मग  गौरी  जेवण  म्हणून  घावन - घाटलं , पुरणपोळी  आणि असंख्य पदार्थ.

म्हणजे थोडक्यात  काय, त्या  ऋतू  मध्ये  जे  जे  मिळतं, जे  शरीराला  पोषक  असतं  असे  सगळे  पदार्थ  नैवैद्य  ह्या  label खाली  देवाला  दाखवून  आपण  हाणायचे  इतकं  साधं  logic. त्यामुळे बाप्पाच्या नावा  खाली  आपलं  पोट खुश ठेवायचं. निसर्गाच्या जवळ जायचं.

तर हा सण थोडक्यात चैतन्य आणतो, चार लोकांना  एकत्र  आणतो, विचारांची  देवाण घेवाण होते. मग त्यात ढोल -ताशा ह्यांच्या पथकांची  भर  पडली. त्याचा आवाज दुमदुमला  कि असा आळस  सगळा  निघून, पळून जातो. पण त्या नंतर येणारं विसर्जन हे काटा आणणारं दृश्य ठरतं.

Plaster of paris च्या मूर्ती आणायच्या, त्या  पण  भल्या  मोठ्या (घरात  सुद्धा), आणि  त्या नदीत विसर्जन  करायला  द्यायच्या. त्या तशाच छिन्न विच्छिन्न विद्रुप होऊन किमान ४-५ दिवस तरी तशाच राहतात. पाणी खराब, आणि त्यावरच्या chemicals, रंगांनी खूप हानी. समुद्रात पण ह्याहून भीषण रूप.

आपण जर त्या कालावधीत देशाच्या बाहेर असू, तर तिथे मात्रं आपण सगळे rules and regulations पाळतो. कारण तिथे कुठल्याच नदीत, ओढ्यात, नाल्यात, tank मध्ये मूर्ती विसर्जनाला परवानगी  नसते. आणि Eco-friendly गणपती सुद्धा मिळतात. त्या वेळेस बादलीत विसर्जन हा उत्तम पर्याय असतो.

मग आपल्याच देशात का बारा हे करत नाही आपण? पूर्ण मातीच्या, शाडूच्या उत्तम मूर्ती आपल्या कडे पण मिळतात. मग का बारा विकत घेताना एवढा विचार होत नाही. विसर्जनाच्या दिवशी का बारा बादलीत विसर्जनाला प्राधान्य दिला जात नाही. किंवा मातीचा गणपती जो खरंच चटकन विसर्जन होतो, असाच गणपती का आणला जात नाही. आणि मग त्याचं विसर्जन सार्वजनिक पद्धतीने केलं तरी चालतं. बांधलेल्या तलावात, नदीत तसंच आपल्या  गणपतीचं विसर्जन केलं  जात. जे पुढचे कित्येक दिवस त्याच रूपात पडून राहतं.
 
भीषण  परिस्थिती

आमचा बाप्पा - Eco Friendly. Hoping to follow same in Pune as well
Ganpati Bappa Moraya.
 
हे सारं बघितलं कि वाटतं. कायदा हा खरंच सक्त हवा. आणि त्याची भीती मनापासून प्रत्येकाने बाळगायला हवी. "आपल्याकडे चालतं" ह्या बिरुदा खाली होणाऱ्या गोष्टींना आळा घालणं खरंच अत्यंत गरजेचं झाला आहे. आणि त्या साठी प्रत्येकाने चार पावलं  उचलणं  हि  तितकाच  गरजेचं. तरंच समाधानाने बाप्पा  आपला निरोप  घेऊन  “पुढच्या वर्षी  लवकर या ” हे  ऐकेल. नाहीतर कदाचित हे  सारं  चित्र  बघून  येणारच  नाही.

तरी सुद्धा गणपती  बाप्पा  मोरया  !

Thursday, September 13, 2018

गणपती बाप्पा मोरया !!


लहानपणा पासून प्रत्येकालाजय बाप्पा करा, हि शिकवण बहुदा आई काही दिवसातच द्यायला सुरुवात करते. अर्थात देव देव करण्या साठी नाही पण कुठे तरी माणसाची श्रद्धा असावी म्हणून. आणि अर्थात त्याच श्रद्धेमुळे माणूस, नतमस्तक व्हायला शिकतो, कोणा समोर तरी आहे नाही तो सगळा अहंकार बाजूला सारून, नुसता शरीराने नाही तर मनापासून झुकायला शिकतो. त्यामुळे बाप्पा जय ची सुरुवात हळूच होते नकळत. मग त्या लहान पोराला, कुठलाही बाप्पा सांगितला तरी तो त्याला भावतो, कारण  मनात  कुठलाच चेहरा, मूर्ती  ठसलेली  नसते.

पण सगळ्यांचाच लहानपणा पासून लाडका बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. काय कोणास ठाऊक, पण गणपती येणार म्हणलं कि असा चैतन्य पसरतं. हवेत एक प्रकारची नशा येते. म्हणजे असा छोटासा उंदीर, मोदक, जास्वदींचं फुल, दुर्वा. आणि आई वडिलांवर श्रद्धा आणि प्रेम. ह्या सगळ्या गोष्टी ऐकत  ऐकत  आपला  बालपण  सरतं.

लहान असताना, गणपती म्हणजे पुणे असा समीकरण डोक्यात होतं. पण मग हळू हळू, शाळा, सुट्ट्या ह्यांचं गणित बसेनास झालं आणि आम्ही रसायनी मध्येच छोटासा गणपती बसवायला  लागलो. मी जाणीव पूर्वक छोटासा म्हणाले. म्हणजे मूर्ती आणायला गेल्यावर plaster of paris च्या मूर्ती बघितल्या आणि नको वाटलं. भव्य मूर्ती, उभ्या, आणि प्रसन्न नाही वाटलं. आजकाल तर म्हणजे घरात सुद्धा भल्या मोट्ठ्या मूर्ती  दिसतात, ज्या  पूर्वी  फक्त  मंडळात  दिसायच्या. असो हा विषय वेगळा आहे.

तर त्या मूर्ती बघून घरी आल्यावर, काही मनापासून आवडल्या नाहीत. आणि मग अचानक कल्पना आली आपणच केली तर. साधारण 2001-2002 ची गोष्ट. थोडीशी पर्व कल्पना:

आम्ही colony मध्ये राहायचो. Colony म्हणजे एक सुरेख छोटंसं गाव, शहर. ज्यात खरंच जात, पात, धर्म ह्यांचा कुठलाही लवलेश कधी जडला नाही. कारण देशातल्या विविध भागातून आलेले लोक. त्यामुळे  तिथे  गणपती, दसरा, अय्यप्पा, ओणम, क्रिसमस, ईद असे सगळे सण साजरे  व्हायचे. आमचे आधीचे शेजारी मुस्लिम आणि नंतरचे ख्रिस्ती होते.

तर असा हा गणपती, आपण घरीच तयार करावा असा विचार झाला. आणि बाजूला ख्रिस्ती मुलगा अतिशय कमाल creative artist कामाला लागला. आई, बहीण, बाबा, बाजूचा मुलगा अभय, त्याचे  वडील  (उत्तम  tips द्यायला), असे सगळे मिळून सचोटीने मूर्ती करण्यात दंग. आणि खरं सांगायचं  तर आपोआप  गणपती  आकार घ्यायचा. रंगकाम. आणि सगळ्यात छान म्हणजे त्याचे डोळे. कारण ते झाले कि असं वाटतं  खरंच  तो  आपल्याकडे  बघत  आहे  छान. आणि असा तो बाप्पा मग तयार व्हायचा.

पुढची गोष्ट असते म्हणजे त्याची सजावट. ते करायला सगळेच उत्सुक. ती करायला उत्साहाने बशीर शेख तयार. आजू बाजूला फुलं, घरात आधी आम्ही बनवलेला धबधबा. सगळं छान natural (thermocol) चा उपयोग तेव्हाही नाही). आणि आमचा बाप्पा विराजमान व्हायचा.

मुद्दाम तो विराजमान व्हायचा म्हणलं. कारण अगदी जवळचा असा बाप्पा. आणि तो हि बहुदा धन्य व्हायचा. कारण कुठल्याही धर्माचा, जातीचा, वर्णाचा नसायचा. फक्त आनंदी भावाने सद्भावनेने केलेला असायचा. आणि म्हणून बहुदा जास्त हसरा, शांत, समाधानी वाटायचा. त्याला thermocol च्या कमळात बसवावं नाही लागलं, विसर्जन केल्यावर हात -पाय -सोंड ह्यांचं विद्रुप रूप नाही झालं, माणसाने बनवलेला आणि  सजवलेला  असायचा. त्यामुळे खूप  हसरा, शांत आणि सुरेख दिसायचा.

हि शिकवण बहुदा आई, बाबा ह्यांनी नकळत रुजवली. कि सगळ्यात मोठ्ठा धर्म म्हणजे माणूस. कारण देवाने सगळे सारखेच तयार केले, त्याला आपण समान पद्धतीने नमस्कार करूयात. आज इतक्या वर्षाने, त्याच मुलाने message करून विचारलं किoffice मध्ये स्पर्धा आहे, मी गणपती बनवणार आहे, पूर्वी आपण बनवायचो तसा. आता ते करून पण 10-11 वर्ष झाली. पण नक्की येईल. काकूंना सांग, त्यांच्यामुळे तो आत्मविश्वास आला.” आणि हे लिहायला आपसूकच प्रेरणा मिळाली.

गणपती बाप्पा मोरया !!