गणपती
बाप्पा म्हणजे आपला लाडका बाप्पा. तो त्याच्या बरोबर चैतन्य, उत्साह, नवीन ऊर्जा सगळं सगळं घेऊन येतो
. दीड, पाच, गौरी - गणपती, दहा अशा विविध
(आपापल्या सोयीने) त्याचं विसर्जन होतं. त्यामुळे
आरती, टाळ, घंटा, टाळ्या सगळं असं अगदी प्रसन्न वातावरण असतं.
वेगवेगळ्या
आरत्या, वेगवेगळी लय, चाल सगळं सुरेल वाटतं
अगदी . त्यात नेहमीच्या ठरलेल्या आरत्या म्हणजे
“सुखकर्ता दुःखहर्ता”, “दुर्गे दुर्गट
भारी” आणि सगळ्यात
भारी आणि असा ऊर्जेचा स्रोत घेऊन येणारी
“शेंदूर लाल चढाओ”.
तर
असा सण म्हणजे काय बोलावं. आणि त्यात प्रसादाची
रेलचेल. आणि महत्वाचं म्हणजे उकडीचे मोदक.
अहाहा. आई त्यावर साजूक तुपाची धार. त्याची
मजा काही औरच. मग
गौरी जेवण म्हणून
घावन - घाटलं , पुरणपोळी आणि असंख्य
पदार्थ.
म्हणजे
थोडक्यात काय, त्या ऋतू मध्ये जे जे मिळतं, जे
शरीराला पोषक असतं असे सगळे पदार्थ नैवैद्य
ह्या label खाली देवाला
दाखवून आपण हाणायचे
इतकं साधं logic. त्यामुळे बाप्पाच्या नावा खाली आपलं पोट खुश ठेवायचं. निसर्गाच्या जवळ जायचं.
तर
हा सण थोडक्यात चैतन्य आणतो, चार लोकांना एकत्र आणतो, विचारांची देवाण घेवाण होते. मग त्यात ढोल -ताशा ह्यांच्या
पथकांची भर पडली. त्याचा आवाज दुमदुमला कि असा आळस
सगळा निघून, पळून जातो. पण त्या नंतर
येणारं विसर्जन हे काटा आणणारं दृश्य ठरतं.
Plaster
of paris च्या मूर्ती आणायच्या, त्या पण भल्या मोठ्या
(घरात सुद्धा), आणि त्या नदीत विसर्जन करायला
द्यायच्या. त्या तशाच छिन्न विच्छिन्न विद्रुप होऊन किमान ४-५ दिवस तरी तशाच
राहतात. पाणी खराब, आणि त्यावरच्या chemicals, रंगांनी खूप हानी. समुद्रात पण ह्याहून
भीषण रूप.
आपण
जर त्या कालावधीत देशाच्या बाहेर असू, तर तिथे मात्रं आपण सगळे rules and
regulations पाळतो. कारण तिथे कुठल्याच नदीत, ओढ्यात, नाल्यात, tank मध्ये मूर्ती विसर्जनाला
परवानगी नसते. आणि Eco-friendly गणपती सुद्धा
मिळतात. त्या वेळेस बादलीत विसर्जन हा उत्तम पर्याय असतो.
मग
आपल्याच देशात का बारा हे करत नाही आपण? पूर्ण मातीच्या, शाडूच्या उत्तम मूर्ती आपल्या
कडे पण मिळतात. मग का बारा विकत घेताना एवढा विचार होत नाही. विसर्जनाच्या दिवशी का
बारा बादलीत विसर्जनाला प्राधान्य दिला जात नाही. किंवा मातीचा गणपती जो खरंच चटकन
विसर्जन होतो, असाच गणपती का आणला जात नाही. आणि मग त्याचं विसर्जन सार्वजनिक पद्धतीने
केलं तरी चालतं. बांधलेल्या तलावात, नदीत तसंच आपल्या गणपतीचं विसर्जन केलं जात. जे पुढचे कित्येक दिवस त्याच रूपात पडून राहतं.
भीषण परिस्थिती |
आमचा बाप्पा - Eco Friendly. Hoping to follow same in Pune as well |
Ganpati Bappa Moraya. |
हे
सारं बघितलं कि वाटतं. कायदा हा खरंच सक्त हवा. आणि त्याची भीती मनापासून प्रत्येकाने
बाळगायला हवी. "आपल्याकडे चालतं" ह्या बिरुदा खाली होणाऱ्या गोष्टींना आळा
घालणं खरंच अत्यंत गरजेचं झाला आहे. आणि त्या साठी प्रत्येकाने चार पावलं उचलणं हि तितकाच
गरजेचं. तरंच समाधानाने बाप्पा आपला
निरोप घेऊन “पुढच्या वर्षी लवकर या ” हे
ऐकेल. नाहीतर कदाचित हे सारं चित्र बघून येणारच
नाही.
तरी
सुद्धा गणपती बाप्पा मोरया
!
No comments:
Post a Comment