Monday, March 22, 2010

गुंफण....

प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळंच स्थान असतं ...वेगळी जागा असते ... आणि मग तीच गोष्टं आपल्या आयुष्याचा एक घटक होउन जाते, अविभाज्य घटक ..आणि स्वतःचं असं वेगळं अस्तित्व सिद्ध करते , आणि मग आपण त्यात पुरते गुंतत जातो, आपल्या भावनांना ते वेगळं विश्व सुखावह भासायला लागतं , आणि त्यात मग भावनांची सुरेल अशी गुंफण घडते .... एक सुखावह, छान, स्वत्चंदी , हवीहवीशी गुंफण ....

त्याला मग काही मर्यादा नसते, सीमा नसते ...त्या भावनांच्या गुंतण्याला कुठला बांध नसतो ... मग ती गुंफण कशाचीही असो ... लहानपणी एखाद्या पेनात , पुस्तकात , त्याच ठरलेल्या bench मध्ये ….. एखाद्या पुस्तकातल्या character मध्ये ....

गुलाबाच्या फुला प्रमाणे श्रुंखलेत राहून गुंफायला , गुंतत रहायला त्याला फार आवडते ....पुढे जाता जाता मागे आपलं अस्तित्व दरवळत ठेवण्यात त्याला आनंद भासतो ...पण मग एक वेगळीच नाळ जोडली जाते ...अगदी घट्ट ,न तुटणारी , त्यातला प्रत्येक क्षण निराळाच ...हवा हवासा , कधी न संपावा असा ...आणि मग घडते एक वेगळीच गुंफण....

" गुंतून गुंतते ह्रदय वेडे ,

स्वप्नाळू जगात पुरते गुंतून पड़ते ...

शृंखलेच्या उबित प्रसन्न पणे वसते ....

आणि त्यातच आपले अस्तित्व मात्र दरवळू देते ....

एकातुनी एक ...असे भाव बांधले जातात ...

आणि मग ती साखळी तोडण्यास चक्क नकार दर्शवतात ...

भावनांचा गुंता असा वाढतच जातो .....

आणि तो गुंताच मग हवाहवासा भासु लागतो .....

छान , मस्त , स्वप्नाळू जगात मग मन रमते ...

एका वेगळ्याच भावविश्वात स्वत्चंदं पणे वावरते ....

गुंतणे कदाचित ह्यालाच म्हणतात ....

आणि मग एक सुंदर गुंफण उदयास येते ........"

PS : It is my friends bunglow’s name ‘गुंफण’ …. N d thought process had started from den n der itself… but could expand the idea only after watching a play few days back….

No comments:

Post a Comment