Thursday, June 3, 2010

सरी वर सर ......





रिम - झिम कोसळणाऱ्या सरी, खाऊन पिऊन धष्ट-पुष्ट गुबगुबीत झालेली हिरवी झाडं, मधूनच पक्ष्यांचा किलबिलाट , रंग- बिरंगी छत्र्या ....आणि माझ्या हातात गरम-गरम चहाचा mug ...आणि मी घरात ...नुसत्या कल्पनेनच मन सुखावून जात...हळूच गालावर कोणीतरी मोरपीस फिरवावं तसं ...त्या पाऊसाला एक वेगळीच लय असते ...स्वतःच्या तालात तो पडत असतो...एक साज असते, मग त्याच्या तालावर सगळे डोलू लागतात , बहरू लागतात ...फुलं, पान , वेली...प्रत्येक जण त्याला दुलून पसंतीची पावती देतं..मग तो मातीचा सुगंध सारा आसमंत व्यापून टाकतो मन कसं प्रसन्न होत...मनावरची धूळ स्वछ करण्याचा काम हा ऋतू करतो... मनावरचा ताण, शीण, साठलेली धूळ, मलगट ....क्षणार्धात दूर होते... नुकताच चालू लागलेल्या मुलाच्या पायातील घुंघरान प्रमाणे एका विशिष्ट लयीत तो कोसळू लागतो ....


पण हे काही त्याचा स्थिर रूप असतं थोडीच ...प्रेमळ , निरागस, स्वत्चांदा वाटणारं त्याचं रूप अचानक भयानक भासू लागतं...इतक्या प्रार्थना , विवंचना, याचना करून तो ती मेघांची कुडी तोडून मुक्त व्हायला तयार झालेला असतो ....पण मग जणू तायला परतीची वात नकोच असते ...जणू तो गर्जून गर्जून सांगत असतो कि "खरं तर मुक्तता नकोच होती मला ...त्या मेघांचय बंदी वासातही खुश होतो मी...पण ते रडवेले चेहरे , आशेने बघणारे नयन ...मला चुकवता आले नाहीत तुमच्या चुकांची शिक्षा त्यांना का ?? म्हणून धर्तीच्या दिशेनं चाल केली मी...त्या पाण्याची किंमत कळावी तुम्हाला म्हणूनच तर मन अधीर होई पर्यंत वात बघवली तुम्हाला" असं म्हणत त्याने त्याचं भयानक , रौद्र रूप दाखवलं...जाणीव करून दिली त्याच्या विविध स्वभावांची ....

जसा तो शांत .....तसाच कमालीचा चिडका ....
जितका मोहक, सुंदर .....तितकाच भयानक......
जसा स्थिर, गोड ...तसाच रौद्र......
विलाम्बिता बरोबर धृत लयही मनात बिंबवून जाणारा.....
विविध रंगी, विविध ढंगी .........पाऊस........

match d pairs करायचे ठरवलं न तर.....ह्याच्या इतक्या जोड्या बहुदा कोणाच्याच होणार नाहीत.....
पाऊस म्हणजे चहा ....अर्थात त्या बरोबर गरम- गरम कांदा भजी हि आलीच....

पावसाळा म्हणजे हिरवागार, प्रसन्न ...
सर म्हणजे मनसोक्त स्वत्चंदपणे भिजण्याचा आनंद....
एक लय, एक ताल , निराळीच साज .....
रिपरीपणारा पाऊस म्हणजे चिखल, traffic , खड्डे आणि घरात पासून हातात चहाचा मुग आणि शांत जुनी गाणी ....
जलधारा ...पाऊस म्हणेज खाल्खाल्णारे प्रसन्न प्रफुल्लीत धबधबे .....
मस्त पांघरूणाच्या कुशीत, गुडूप व्हावं अशी नं बोचणारी पण सुखावह वाटणारी थंडी .....

क़ा कुणास ठाऊक पण तो कसाही असला तरी माझा अगदी आवडता.... प्राणप्रिया ... त्याच्या प्रत्येक थेंबात जणू काही गुपितं हळू हळू उघडी करतो तो ....पण हातचं राखून ...किती जणांना अधीर करतो, डोळ्यात पाणी यायला भाग पडतो ...काही पिसारा फुलवून तयार तर कोणी त्या एका थेंबासाठी कित्येक महिने अधीर ...आणि धरतीही त्याच्या पदस्पर्शा साठी आसुसलेली.... आणि मग त्याची तयारी सुरु होते ...वाजत, गाजत, गर्जत , मोठ्ठ्या ताठ मानेनं अभिमानानं कधी हळूच, कधी जोरात तो धर्तीच्या कुशीत शिरतो..... ती पृथा त्या बालकाच्या मिठीस आतुर जणू ....ते मिलन इतका सुखावह असतं ...इतका पवित्र असतं ..भावनांचा इतके महिने थांबवलेला बांध फुटलेला असतो ..त्या मातेच्या कुशीत तो शांतपणे झोपी जातो मग ....आणि स्वतःचा अस्तित्व मात्र त्या मृदगंधेच्या रुपात दरवळत ठेवतो ...............

2 comments: