Wednesday, August 15, 2018

निसर्ग सौंदर्य आणि सण


लहान पणापासूनच काय कोणास ठाऊक, पण पावसाळा हा ऋतू फार लाडका माझा. प्रसन्न फुललेली झाड, डोलणारी मोहक रंग बिरंगी फुलं, उन  - पाऊस ह्यांचा लपंडाव …अहाहा . एक्दम झकास. निसर्गाच्या सुरेख प्रफुल्लित छटा दर्शवणारा हा महिना. आणि मग  आपसूकच  येणारे वेगवेगळे सण. खर तर ना पूर्वी पासूनच आपल्याला शिकवलंय कि निसर्गावर प्रेम  करा आणि सण हि त्याच साठी. कारण कदाचित असा घाट घातला नसता तर कधीच ह्या गोष्टी  पुढे  आल्या नसत्या.

पण मूळ गाभा मागे पडत गेला …आणि  फक्त  रूढी  परंपरा  पुढे  आल्या. मग  काही  जणांनी  तेवढच लक्षात ठेवला, म्हणजे नैवेद्य, ह्या हाताने  हळद, त्या बोटाने  कुंकू, अशी पूजा  मांडायची  …पण हे सगळं कशासाठी हे मागेच पडल.

श्रावण महिना हा अतिशय प्रफुल्लित महिना. आणि एकंदरीतच पावसाळा  म्हणजे  नव  चैतन्य, नवा उत्साह आणणारा  ऋतू.

म्हणजे “सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले. “उपास करा, वडाच्या झाडा भोवती प्रदक्षिणा घाला, आणि नवर्याच्या आयुष्याची प्रार्थना करा. हे सांगणं अगदी रास्त. पण मग कालांतराने, नवऱ्याच आयुष्य आणि वडाच झाड एवढच लक्षात राहिल. आणि वडाच्या झाडा भोवती प्रदक्षिणा घालण्या  ऐवजी , त्याच  वडाच्या फांद्या घरी  येऊ लागल्या. अर्थात तो सण कशासाठी होता, ह्याचा खरा अर्थ मागेच पडला आणि नुसतच    फांदी  आणि  नवरा  आणि  त्याच आयुष्य असं  होऊन  गेला. पण जगातला वड कमी झाला तर कसं बर वाढणार नवऱ्याच आयुष्य. “सावित्रीने सत्यवानाला त्या वडाच्या झाडा खाली ठेवले, आणि त्याचा प्राण पुन्हा आला. कारण वडाच झाड सगळ्यात जास्त श्वासाला लागणार Oxygen देतो, आणि सत्यवानाचा प्राण  वाचला. पूर्वीच्या काली मुली एवढ्या घराच्या बाहेर पडत नसत. वडाच झाड हे स्त्रीच्या शारीसाठी अत्यंत चांगला. तोच Oxygen तिच्या शरीरात गेला तर त्याचा फायदा हि तिलाच होणार, आणि तिची तब्येत चांगली राहिली तर आपसूक  ती  आनंदी  राहणार  आणि  नवराही  आनंदी. आनंदी माणसाच आयुष्य छान, उत्तम आणि वाढणारच. हाच तो निर्मळ निसर्ग.

श्रावणात येणारे अजून सण म्हणजे, बायकांची मंगळागौर. नवऱ्याच आयुष्य वाढाव म्हणून केलेली पूजा. देवीची पूजा लग्ना नंतर करणे. आणि त्याला कुठलाही सोन्या, चांदीची आभूषण न वाहणे. तर चक्क, आपल्या हाताने झाडांची विविध  पत्री  (अर्थात  पान), सुवासिक  फुलांची  पत्री , फुलं  वाहणे. फळांचा नैवेद्य दाखवणे. म्हणजे तुम्ही विविध झाडांना स्पर्श कराल. तुमच्या शरीराला त्याचा उपयोग होईल. तब्येत छान   राहील. पालवी तोडल्या मुळे, नवीन पालवी यायला मदत होईल. फळ उत्तम मिळतात, त्याचाच नैवैद्य (अर्थात आपला आपल्या  जिभेवर  अर्थात  वासनांवर  किती  control आहे  पाहणे). त्या प्रसन्न वातावरणात गेल्या मुळे, प्रसन्न वाटणार. निसर्गाच्या इतक्या  जवळ  गेल्यावर, कोणाला  छान, प्रसन्न, आणि  आत्ताच्या काळात  Stress free नाही  वाटलं  तरच  नवल. मग जीव खुश, आनंदी  आणि  आनंदी  मन. अर्थात तब्येत  उत्तम, आनंदी. नवरा पण आनंदी. अर्थात उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य.

अजून एक येणारा माझा लाडका दिवस म्हणजे “हरितालिका. आईने आमच्या कधीच देव देव केल नाही. हे इथे ठेवा, ह्याला हात लावू नका, सोवळं-ओळं, उपास. असले प्रकार कधी पाहिले नाहीत. पण त्या मागची कारण मात्र लहानपणा पासून सांगितली. आणि कदाचित म्हणून आम्ही काही गोष्टींचा अश्या पद्धतीने विचार करू शकतो. “कंद मुळं, फळं खाऊन तिने हा उपास केला …. आणि मग तिच्यावर शंकर देव प्रसन्न झाले. मला खूप छान वाटायचं हे ऐकून. मला असा कोणी भोळा शंकर मिळावा म्हणून नाही तर, पुन्हा झाडाची  फुलं , पत्री  तोडायला  मिळणार  म्हणून. त्यातही तेच. कुठलाही महागडा दागिना त्या देवाला नकोय. आपली झाडांची पत्री (पान), फळं, कापसाची वस्त्र. अर्थात बोटाना त्या झाडांचा स्पर्श. आणि तेव्हा वातावरणा मुळे पचनसंस्था मंदावलेली असते. त्यामुळे एखाद दिवस असा हलका आहार घेतल्याने metabolism rate वाढतो. त्याला देवाचा आणि व्रत वैक्यलांची भीती घातली गेली. कारण निसर्ग, पचनसंस्था अस सांगितलं असत तर कदाचित कोणीच लक्ष दिल नसत. आणि आपल्या आतल्या देवाला बघा, अर्थात शांत  बसा, डोळे  मिटून  किमान  पाच  मिनटं  तरी  शांत बसा.

 

हे सगळं नीट समजून घेतल तर कळत, diet, diet plan, food items, हे आता प्रकाशाने मोठे झालेले शब्द पूर्वी पण होते. पण काही अंशतः क्लिष्ट पद्धतीने सांगितले होते. पण सांगितले खूप पूर्वी पासून होते. आमच्या आईने आम्हाला हेच शिकवलं. आणि मनाला समाधान लाभणं अधिक महत्वाच. पण “अरे फारच देव देव करता, कशाला तिथे जाऊन enjoy करा” अस कोणी म्हणलं कि जरा  गोंधळायला  होत. ह्याला देव देव म्हणत नाहीत. आपले उच्चार आणि एकेका अवयवाची ताकद वाढवणारे मंत्रोचार स्तोत्र, म्हणणे, आणि  आलेल्या  गरजू  माणसाला  त्या  वेळेला  जेवायला  देन  (मी  सोवळ्यात  आहे, माझा उपपास  आहे, आमचा  मेहूण अजून जेवायचं  आहे, नैवैद्य  व्हायचंय), म्हणजे  श्रद्धा आणि  शुद्ध  भाव. नाहीतर आंधळे पणाने, त्याला फक्त  करत  राहणे, म्हणजे  अंधश्रद्धा .

तर ह्या Britain मध्ये सुद्धा सुदंर झाड, पान, फुलं आहेत.  आणि त्याचा हि लाभ मी आणि  आईने घ्यायचा ठरवलं. आणि तो घेतला. अर्थात तेव्हा मंगळागौर आणि हरतालिका आली. तर  त्याला आमचा नमस्कार.

No comments:

Post a Comment