Wednesday, August 15, 2018

निसर्ग सौंदर्य आणि सण


लहान पणापासूनच काय कोणास ठाऊक, पण पावसाळा हा ऋतू फार लाडका माझा. प्रसन्न फुललेली झाड, डोलणारी मोहक रंग बिरंगी फुलं, उन  - पाऊस ह्यांचा लपंडाव …अहाहा . एक्दम झकास. निसर्गाच्या सुरेख प्रफुल्लित छटा दर्शवणारा हा महिना. आणि मग  आपसूकच  येणारे वेगवेगळे सण. खर तर ना पूर्वी पासूनच आपल्याला शिकवलंय कि निसर्गावर प्रेम  करा आणि सण हि त्याच साठी. कारण कदाचित असा घाट घातला नसता तर कधीच ह्या गोष्टी  पुढे  आल्या नसत्या.

पण मूळ गाभा मागे पडत गेला …आणि  फक्त  रूढी  परंपरा  पुढे  आल्या. मग  काही  जणांनी  तेवढच लक्षात ठेवला, म्हणजे नैवेद्य, ह्या हाताने  हळद, त्या बोटाने  कुंकू, अशी पूजा  मांडायची  …पण हे सगळं कशासाठी हे मागेच पडल.

श्रावण महिना हा अतिशय प्रफुल्लित महिना. आणि एकंदरीतच पावसाळा  म्हणजे  नव  चैतन्य, नवा उत्साह आणणारा  ऋतू.

म्हणजे “सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले. “उपास करा, वडाच्या झाडा भोवती प्रदक्षिणा घाला, आणि नवर्याच्या आयुष्याची प्रार्थना करा. हे सांगणं अगदी रास्त. पण मग कालांतराने, नवऱ्याच आयुष्य आणि वडाच झाड एवढच लक्षात राहिल. आणि वडाच्या झाडा भोवती प्रदक्षिणा घालण्या  ऐवजी , त्याच  वडाच्या फांद्या घरी  येऊ लागल्या. अर्थात तो सण कशासाठी होता, ह्याचा खरा अर्थ मागेच पडला आणि नुसतच    फांदी  आणि  नवरा  आणि  त्याच आयुष्य असं  होऊन  गेला. पण जगातला वड कमी झाला तर कसं बर वाढणार नवऱ्याच आयुष्य. “सावित्रीने सत्यवानाला त्या वडाच्या झाडा खाली ठेवले, आणि त्याचा प्राण पुन्हा आला. कारण वडाच झाड सगळ्यात जास्त श्वासाला लागणार Oxygen देतो, आणि सत्यवानाचा प्राण  वाचला. पूर्वीच्या काली मुली एवढ्या घराच्या बाहेर पडत नसत. वडाच झाड हे स्त्रीच्या शारीसाठी अत्यंत चांगला. तोच Oxygen तिच्या शरीरात गेला तर त्याचा फायदा हि तिलाच होणार, आणि तिची तब्येत चांगली राहिली तर आपसूक  ती  आनंदी  राहणार  आणि  नवराही  आनंदी. आनंदी माणसाच आयुष्य छान, उत्तम आणि वाढणारच. हाच तो निर्मळ निसर्ग.

श्रावणात येणारे अजून सण म्हणजे, बायकांची मंगळागौर. नवऱ्याच आयुष्य वाढाव म्हणून केलेली पूजा. देवीची पूजा लग्ना नंतर करणे. आणि त्याला कुठलाही सोन्या, चांदीची आभूषण न वाहणे. तर चक्क, आपल्या हाताने झाडांची विविध  पत्री  (अर्थात  पान), सुवासिक  फुलांची  पत्री , फुलं  वाहणे. फळांचा नैवेद्य दाखवणे. म्हणजे तुम्ही विविध झाडांना स्पर्श कराल. तुमच्या शरीराला त्याचा उपयोग होईल. तब्येत छान   राहील. पालवी तोडल्या मुळे, नवीन पालवी यायला मदत होईल. फळ उत्तम मिळतात, त्याचाच नैवैद्य (अर्थात आपला आपल्या  जिभेवर  अर्थात  वासनांवर  किती  control आहे  पाहणे). त्या प्रसन्न वातावरणात गेल्या मुळे, प्रसन्न वाटणार. निसर्गाच्या इतक्या  जवळ  गेल्यावर, कोणाला  छान, प्रसन्न, आणि  आत्ताच्या काळात  Stress free नाही  वाटलं  तरच  नवल. मग जीव खुश, आनंदी  आणि  आनंदी  मन. अर्थात तब्येत  उत्तम, आनंदी. नवरा पण आनंदी. अर्थात उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य.

अजून एक येणारा माझा लाडका दिवस म्हणजे “हरितालिका. आईने आमच्या कधीच देव देव केल नाही. हे इथे ठेवा, ह्याला हात लावू नका, सोवळं-ओळं, उपास. असले प्रकार कधी पाहिले नाहीत. पण त्या मागची कारण मात्र लहानपणा पासून सांगितली. आणि कदाचित म्हणून आम्ही काही गोष्टींचा अश्या पद्धतीने विचार करू शकतो. “कंद मुळं, फळं खाऊन तिने हा उपास केला …. आणि मग तिच्यावर शंकर देव प्रसन्न झाले. मला खूप छान वाटायचं हे ऐकून. मला असा कोणी भोळा शंकर मिळावा म्हणून नाही तर, पुन्हा झाडाची  फुलं , पत्री  तोडायला  मिळणार  म्हणून. त्यातही तेच. कुठलाही महागडा दागिना त्या देवाला नकोय. आपली झाडांची पत्री (पान), फळं, कापसाची वस्त्र. अर्थात बोटाना त्या झाडांचा स्पर्श. आणि तेव्हा वातावरणा मुळे पचनसंस्था मंदावलेली असते. त्यामुळे एखाद दिवस असा हलका आहार घेतल्याने metabolism rate वाढतो. त्याला देवाचा आणि व्रत वैक्यलांची भीती घातली गेली. कारण निसर्ग, पचनसंस्था अस सांगितलं असत तर कदाचित कोणीच लक्ष दिल नसत. आणि आपल्या आतल्या देवाला बघा, अर्थात शांत  बसा, डोळे  मिटून  किमान  पाच  मिनटं  तरी  शांत बसा.

 

हे सगळं नीट समजून घेतल तर कळत, diet, diet plan, food items, हे आता प्रकाशाने मोठे झालेले शब्द पूर्वी पण होते. पण काही अंशतः क्लिष्ट पद्धतीने सांगितले होते. पण सांगितले खूप पूर्वी पासून होते. आमच्या आईने आम्हाला हेच शिकवलं. आणि मनाला समाधान लाभणं अधिक महत्वाच. पण “अरे फारच देव देव करता, कशाला तिथे जाऊन enjoy करा” अस कोणी म्हणलं कि जरा  गोंधळायला  होत. ह्याला देव देव म्हणत नाहीत. आपले उच्चार आणि एकेका अवयवाची ताकद वाढवणारे मंत्रोचार स्तोत्र, म्हणणे, आणि  आलेल्या  गरजू  माणसाला  त्या  वेळेला  जेवायला  देन  (मी  सोवळ्यात  आहे, माझा उपपास  आहे, आमचा  मेहूण अजून जेवायचं  आहे, नैवैद्य  व्हायचंय), म्हणजे  श्रद्धा आणि  शुद्ध  भाव. नाहीतर आंधळे पणाने, त्याला फक्त  करत  राहणे, म्हणजे  अंधश्रद्धा .

तर ह्या Britain मध्ये सुद्धा सुदंर झाड, पान, फुलं आहेत.  आणि त्याचा हि लाभ मी आणि  आईने घ्यायचा ठरवलं. आणि तो घेतला. अर्थात तेव्हा मंगळागौर आणि हरतालिका आली. तर  त्याला आमचा नमस्कार.

Friday, August 3, 2018

नैसर्गिक खाद्यसंस्कृती - 1 🍓🍒🍐🍎


Its been four months that I have been staying in UK. And I keep on remembering this statement by Osho “My definition of religion is: to be in tune with nature”, again and again.

It teaches you so much and brings in, you from You totally. The summers are flowering everywhere with fruits and flowers bloom in full swing. But I had never imagined that I would sense that happiness on my and more than that on my families face.💚💚💚 
 



 
My mother and sister went crazy seeing the fresh cherry tree, nest to my apartment. And jumping to height, picking up cherry and eating it fresh.

निसर्ग खरंच इतका  सुरेल, सुंदर, आणि प्रेमळ आहे ना कि त्या क्षणी  सगळं  विसरायला  लावतो. म्हणजे  आता  संध्याकाळी  चालायला  जाणे, हे  एक  routine झालंय. पाण्याची  बाटली आणि  पाठीला  एक  छोटीशी  सॅक  आणि  चालणे  हे  एक  छान  time table सेट  झालंय . इथली  अजून  एक  चांगली  गोष्ट म्हणजे , दार  15 मिनीटांनी  एक  बाग  आणि  हिरवळ  हे  समीकरण. त्यामुळे  नेत्र  सुख पुष्कळ. त्यात  नदीचा  काठ. आणि  त्यात  पाण्यावर  तरंगणारे  राजहंस  आणि  बदकं.

तर  अशा  ठिकाहून  chalat जाताना अचानक  असंख्य  फळांची  झाडं  दिसतात. ब्लॅकबेरी, पेअर, सफरचंद , चेरी  🍓🍒🍐🍎…. आणि  ती  अशी  चालत  जाताना  काढायची, आपल्याकडे  असलेल्या  बाटलीतल्या  पाण्याने  धुवायची  आणि  लगेच  तोंडात.

हे  करताना  आई  आणि  बहिणीच्या  चेहऱ्यावरचा  आनंद  खरंच  टिपण्या  जोगा. निसर्गाच्या  इतक्या  जवळ  जाणे  म्हणजे  काय  हे  तिथे  कळलं. माणसाला  जगायला  अजून  काय  लागतं. हा  खरंच  सात्विक, निर्मळ  आनंद  आणि  त्या  फळांची  गोडी  तर  निराळीच.

म्हणजे  ह्याचा  आनंद  भारतात  पण  घेतला  आहे . फक्त  आपली  फळं,  इथे  हि  फळं. पण  रस्त्याच्या  donhi बाजूला  हेच . आणि  स्वच्छ  हा  एक  भाग  फार  महत्वाचा. कारण  “Respect Nature” हे  मेंदूत  आणि   मनात  ठाम  आहे .  हि  एक  गोष्ट  नक्की  शिकुयात. निसर्ग  फक्त  सेल्फी काढायला  बनलेला  नसून, त्यावर  प्रेम  करायला  हि  बनलाय , हे  ज्या  दिवशी  कळेल  आणि  पटेल, सगळंच  छान  होईल  :)

Nature is God….Love thy nature…. That’s the best prayer you can offer. Lets wake up its high time.

Tuesday, June 5, 2018

“My definition of religion is: to be in tune with nature” - Osho


Nature is God….Love thy nature…. That’s the best prayer you can offer

We learn such an important thing in school, but I think we only increase the number of ages in our kitty, but become dumb as we add those numbers. We purposely tend to forget these things probably, as we grow.

“If you truly love nature, you will find beauty everywhere”

Osho says it beautifully “My definition of religion is: to be in tune with nature”.

Yes and that’s so very beautifully quoted. It teaches you everything, seriously everything.

the trees, leaves, branches, flowers, fruits are so very beautifully in sync with sun and moon.

They are happy…they wave…they bloom…they grow…they flower…blossom in tune with sun and moon

They respect the sun and moon

They wave with the wind, they bloom with the wind

They bloom beautifully in different way in each and every season

Bloom beautifully with sun, dance heavily with rains, blossom in amazing way with cold, snow.

Change their colour according to five elements.

And enjoy each and every moment. They express their happiness in such a beautiful way. They create music, rhythm in even small sizzles of leaves.

They are the best teacher in whatever we do. Then why can’t we love them and in turn respect them. Why do we show disrespect by throwing, spitting unwanted things on road, garden. Why can’t we keep it as it is. In simpe terms Beautiful.

There are small steps that each and every individual can follow:

1.    Avoid Plastics (Thanks to government, Plastic is banned now)

2.   Have cup of tea in your own favourite mug, rather than plastic, thermocol cups and increase garbage

3.   Carry your own vegetable bag with you

4.   Carry a small steel/ copper water bottle wherever you go, so that buying of plastic water bottles will be minimised.

5.   Avoid plastic , thermocol plates, spoon, glasses for parties. We get plates made up of bamboo, leaves.

6.   Carry chocolate wrappers, wafers pack with you and throw when you see a garbage bin in public place. Or throw when you reach your house.

7.   Hold your spit, or throw in your own container. Carry container with you.

8.   Respect the nature that God has given you.

9.   Beautiful sun, great warm filled rains, awesome flowers blooming everyday, fruits that we eat.

I think, genuinely it needs to be the first lesson, we need to teach kids when they enter school, to love the nature and respect it. It is because of which we are. And don’t take it for granted.
Just imagine, sun does not rise one day, because it felt bad about the disrespect that we have shown towards them. Or it forgot to go and it was sunny day and night. I know, its kiddish, but sometimes, it is required.
Then attending summits, and having discussions why did this happen. Lets wake up. Its high time.

And by the way …. Happy Environment Day to all my nature loving folks !!

Sunday, April 29, 2018

चहा..... Ek Story

चहाला  वेळ  नसते …वेळेला  चहा  असतो …

हे वाक्य अगदी  तंतोतंत खरं  आहे . ती तल्लफ़च  वाईट. गारठा,  कुडकुडणारी  थंडी, पाऊस …असं वातावरण आपोआपच  त्या ‘एक  कप  चाय’ ची आठवण करून  देतं .


चहाहि  गोष्टच  अशी  आहे  ना …कि  म्हणजे एक प्रबंध तयार होऊ शकतो . पु    च्या भाषेत ‘साधी  आपली  लोकं  काय  आपले  साधे  पोहे  आणि  चहा ….. आणि अशी श्रीमंत लोकं मग जायफळयुक्त कॉफी आणि बटाटे पोहे वगैरे’’.

पण  चहाची  तहान  हि  चहाच  घालवू  शकते. म्हणजे  एक  असं  special  नातं  असतं  त्या  चहा  बरोबर. आधी  बिस्कीट  किंवा  टोस्ट  बुडवण्या  एवढाच  चहा  मिळायचा …. मग  दुधाचा  चहा , नुसता  रंगाचा  देखावा …. आणि  पूर्वी  शाळेत  त्याची  कधी  आवड  पण  नव्हती.

मग पुण्यात आल्यावर  3.30 चा  चहा  introduce झाला. थंडीत तो गरम  कप  सुरेख  वाटू  लागला. आपला वाटू लागला . आणि  मग  पुरुषोत्तम .

पुरुषोत्तम  = theatre = 1 किटली  = मागून  मागून  प्यायलेला  चहा.

आणि  मग  ऑफिसला  तर  आपणच  म्हणायचं  ‘’झोप  येत  आहे  यार , चला  चहा  पिऊयात ’’. मग  इथं  पासून  सुरु  होणार  समीकरण, ‘कंटाळा  येतोय  चला  चहा’, ‘वेळ  झाली  चला  चहा’, ‘मीटिंग  आहे  माझी  ग …त्या  आधी  पटकन  चहा  पिऊयात’, ‘ह्या AC ने डोकं जड झालय, चला चला पिऊयात’ ‘घसा  खवखवतोय, चला  चहा’

तर थोडक्यात त्या चहाशी एक नातं आहे . अगदी जवळच, घट्ट, आपलं  असं  .

मग तो दहा वेळा उकळून दिलेला असो , टपरी वरचा असो.

तर  अशा  ह्या  गोष्टी  बद्दल  एवढा  लिहिण्याचा  कारण  असं  कि …. पर्वा  अशीच  कोपऱ्यावरच्या  टपरीची  फार प्रकर्षानं आठवण झाली.

आपण  बाहेरच्या  देशात  असतो , थंडीने  गुरफटलेलो  असतो . घरी  जायला  म्हणून  लागतो , आणि  अचानक  गार  वारं , आणि  पाऊस  सुरु  होतो. ह्या  अश्या  कुंद   पावसाळी  वेळेला, त्या  एका  कपची  आठवण  नाही  झाली  तरच  नवल. मग  तुमच्या  लक्षात  येत  कि  घरचं  दूध  संपलंय. मग ते  आणायचे  आहे. आणि  मग  रस्ते  लक्षात  ठेवत  ठेवत ..त्या  google च्या  बाईचं   ऐकत  ऐकत  – ती  तुम्हाला  योग्य  दिशा  दाखवत  असते. आणि  मग  तुम्ही  पोचता  खरं  पण  ते  दुकान  बंद  दिसतं . तुम्ही  अगदी  नवखे . थोडासा गोंधळ  उडतो. मग  पुन्हा  चालायला  लागता, वारा, पाऊस  सोबतीला  असतोच. आणि  मग  रस्ते , गाड्या , नवीन  चेहरे  असं  गोंधळून  जात , त्या  एका  दुधाच्या  कॅन  साठी  फिरत  बसता . शेवटी  ‘देवा …. आता  खरंच  वरून  पावसाच्या  ऐवजी  चहा  पाड  थोडासा’, अशी फँटसि सुद्धा  डोक्यात  येऊन  जाते. बरं  ते  नाहीतर  एखादं  दुकान  तरी  दाखव  रे  देवा. Weekend चा  मूड  असतो . आपल्या  डोक्यात  एकंच  चहा  हवाय. आणि  मस्त  उकळलेला , दुधाचा  असा  चहा  हवाय. देव  पावतो  एकदाचा  थोडासा , एक  दुकान  दिसतं …. ‘Wine, Beer and Grocery’. Grocery मध्ये  दूध  असणार  ह्या  आशेने  आपण  आत  जातो. तर  अनंत  प्रकारच्या  दुधाच्या  बाटल्या  नजरेस  पडतात. आणि  दुसरा  माणूस  त्या  बाटली  कडे  बघण्याचा  विचार  करायच्या  आत …आपण  झेप  घेऊन  ‘पेहले  मैने  देखा’ असं  म्हणत  ती  बाटली  घेऊन  बाहेर.
 
पाय  तुडवत  घराच्या  दिशेने  पाय  पळू  लागतात.  आणि  मनात विचार येतो  ‘आता  इथे  जर  ह्या  कोपऱ्यात  मी  चहाची  गाडी  टाकली …आणि  ‘Tea On Wheels’ असं  म्हणत  आपल्या  सारख्या  अनंत  गरजू  लोकांना  चहा  पुरवला  तर  काय आशीर्वाद मिळतील.

असो … आणि  मग  तो  छान  उकळलेला  चहा  , गॅस  वरून , भांड्यात , गाळतणीतून    कपात  आणि  मग  माझ्या  घशात  जाताच  मला  कळलं  ‘स्वर्गानंद’ बहुदा  ह्यालाच  म्हणत  असावेत.